मद्य परवान्यासाठी अर्ज करण्यासाठी आपले वय वर्षे२५ किंवा त्यापेक्षा अधिक असणे आवश्यक आहे.
पत्त्याचा पुरावा आणि ओळखीचा पुरावा (जो वयाचा पुरावा देखील आहे)
मान्य पत्त्याचा पुरावा: पासपोर्ट / आधार कार्ड / निवडणूक कार्ड / वाहन परवाना
मान्य ओळखीचा पुरावा: पासपोर्ट / आधार कार्ड / निवडणूक कार्ड / वाहन परवाना / पॅन कार्ड
हा परवाना तीन प्रकारच्या वैधतेसह येतो
१. आजीवन
२. एक वर्ष
नाही, हा परवाना महाराष्ट्र राज्याबाहेर मान्य नाही. शिवाय, प्रत्येक राज्याचे स्वतःचे नियम आहेत.
१. एका वर्षा साठी: ₹ 749/-
२. आजीवन साठी: ₹ 1749 /-
नाही, शासकीय विभाग डिजीटल स्वाक्षरीकृत पीडीएफ फाइल प्रदान करते, आपली इच्छा असल्यास आपण त्याची प्रिंट घेऊ शकता.
liquorpermits.in तुम्हाला ती पीडीएफ फाइल ईमेल करेल आणि व्हॉट्सॲप करेल
आपल्याला माहिती आहे की आम्ही ऑनलाईन फॉर्म भरण्याची प्रक्रिया पूर्ण करण्यात आपल्याला मदत करणारे खासगी सल्लागार आहोत.
आपल्या वतीने आम्ही आपला फॉर्म भरुन, आपली क्रेडेन्शियल तयार करू, आपले कागदपत्रे अपलोड करू आणि यासाठीचे शासकीय शुल्क भरु. मग आम्ही आपल्या अर्जाचा मागोवा ठेवू आणि जेव्हा आपला अर्ज मंजूर होईल आणि परवाना विभागातून तयार केला जाईल, आम्ही तो डाउनलोड करुन ईमेल आणि व्हॉट्सॲपद्वारे आपल्याकडे पाठवू.
हा परवाना आपल्याला महाराष्ट्र राज्यात परदेशी मद्य आणि देशी मद्य खरेदी, ताबा, वाहतूक, वापर करण्याची आणि पिण्याची सशर्त परवानगी देते.
एका व्यक्तीकडे परमिटसह एकावेळी अंदाजे 12 बाटल्या असु शकतात.(अंदाजे १००० मी.ली. च्या)
सविस्तर खालील प्रमाणे,
देशी दारू 2,
स्पिरीट (आयएमएफएल, आयातित) 12,
टॉडी 12,
इतर द्रवपदार्थ ज्यात अल्कोहोल आहे 12,
बीअर 12,
वाइन 12
अजिबात नाही, मद्य पिऊन वाहन चालवने हा भारतीय कायद्यानुसार दंडनीय गुन्हा आहे.
नाही, आपण इतर राज्यांतून मद्य आणू शकत नाही कारण राज्यांमध्ये कर वेगवेगळे आहे.
चंद्रपूर, गडचिरोली आणि वर्धा.
जर तुम्ही परवानगी न घेता महाराष्ट्रात मद्यप्राशन, सेवन किंवा वाहतूक करताना पकडले गेले तर महाराष्ट्र निषेध अधिनियम १९९४ च्या अंतर्गत तुम्हाला ₹५०,००० रुपये आणि / किंवा पाच वर्षापेक्षा जास्त कारावासाची शिक्षा होऊ शकते.
नाही, सर्व नियम पुरुष आणि स्त्रियांसाठी समान आहेत. केवळ अर्जदाराचे वय २५ किंवा त्याहून अधिक असावे.